इतिहासकट्टा बद्दल..

छत्रपती शिवराय म्हणजे अखंड चैतन्याचा अविष्कार, मूर्तिमंत धैर्याचा साक्षात्कार अन् धगधगत्या हिंदुत्वाचा हुंकार ! मंडळी, गेली अनेक वर्षे आपण आपल्या 'जनसेवा समिती, विलेपारले' या संस्थेच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून या श्रीमानयोग्याची मनोभावे अर्चना करतोय. 'शिवरायांसी आठवावे । जीवित तृणवत मानावे' हे वाचन नित्य पूजनीय, वंदनीय आणि अनुकरणीय आहे यात शंकाच नाही. पण त्या ही पलीकडे जाऊन दुर्दैवाने असं म्हणावसं वाटतं की, आम्हां मराठीजनांसाठी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या अभ्यासाचा ओनामा शिवरायांपासून सुरु होतो आणि त्याच नावाशी येऊन थबकतो ! शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या वारसदारांनी आणि इथल्या सामान्य प्रजाजनांनी जो दैदिप्यमान इतिहास त्यांच्या महानिर्वाणाच्या पश्चात रचला आहे तो खूपच जाज्वल्य आणि प्रेरणादायी आहे. परंतु आपलं दुर्भाग्य असं की, त्या इतिहासाचा आपल्याला आज अल्प परिचय आहे. सन १६८२ ते सन १७०७, अर्थात औरंगजेबाचे महाराष्ट्रात आगमन ते त्याचे निर्गमन हा तो २५ वर्षांचा धगधगता कालखंड, जो दुर्दैवाने उपेक्षित राहिला आहे. आणि याच दुर्लक्षित, सर्वसामान्यांसाठी अपरिचित राहिलेल्या इतिहासाच्या कालखंडातील प्रेरणादायी आणि गौरवशाली घटना आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण एका ब्लॉग सिरीज मधून इतिहासप्रेमींसमोर मांडण्याचा आपण संकल्प सोडत आहोत.

इतिहासकट्टा- गौरव इतिहासाचा ! या शीर्षकाखाली दि. १० मे २०१७ रोजी म्हणजेच स्वर्गीय निनादराव बेडेकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण हि ब्लॉग सिरीज सुरु करत आहोत. या दिवसापासून प्रत्येक आठवड्याला एक लेख याप्रमाणे प्रत्येक महिन्यात चार लेखांची मालिका (२ मराठी व २ इंग्रजी) अशी सादर करण्यात येणार आहे. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर- १६८२ ते १७०७ ही ब्लॉग सिरीज आपलीच मंडळी लिहिणार असून मराठी व इंग्रजी असे द्वैभाषिक स्वरूप या लेखमालेचे असणार आहे. अमोल मांडके, उमेश जोशी, राहुल भावे, केतव चाफेकर, अदिती काजरेकर आणि जान्हवी दातार अशी सहा जणांची टीम या लेखमालेची धुरा वाहणार आहे, तर पराग लिमये आणि उमेश जोशी या लेखमालेचे संकलन करणार आहेत. या लेखांच्या बरोबरीनेच इतर पूरक ऐतिहासिक माहिती, नकाशे, छायाचित्रे यांनी हा ब्लॉग माहितीपूर्ण बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. इतिहासकट्टा- गौरव इतिहासाचा हिरे ब्लॉग सिरीज सुरु करण्यामागची मूळ संकल्पना अदिती काजरेकर आणि जान्हवी दातार यांची आहे. अतिशय वेगळा, गुंतागुंतीचा आणि प्रवाही घडामोडींचा हा कालखंड आणि त्यावर अभ्यास, संदर्भ तपासून लेखन करणं हे एक शिवधनुष्य पेलण्याइतकंच अवघड आणि आव्हानात्मक कार्य आहे. या मंडळींनी हा वसा अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. 'अभ्यासोनि प्रकटावे' या समर्थांच्या उक्तीला डोळ्यांसमोर ठेऊन ही मंडळी यात आपले योगदान अर्पण करणार आहेत. अर्थात, हे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. आणि म्हणूनच आपला हा अनोखा उपक्रम यशस्वी होईल ही आम्हाला खात्री आहे. तेव्हा मंडळी, आपण भेटूच या ब्लॉग सिरीजवर. दि. १० मे २०१७ रोजी एका नवीन उपक्रमाचा श्रीगणेशा करूया.. तुम्हा सर्वांनी आवर्जून हे लेख वाचा अशी नम्र विनंती आहे. त्याचबरोबर तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया, सूचनाही आम्हाला जरूर कळवा ! इतिहासकट्टा- गौरव इतिहासाचाच्या संपूर्ण टीमला जनसेवा समिती परिवारातर्फे उत्तमोत्तम शुभेच्छा. धन्यवाद !

- पराग लिमये,
दि. १० मे २०१७

About our blog..

Maratha Uprising against Mughal Empire-1682 to 1707

The newly born Hindavi Swarajya was put to a severe survival test not in the reign of Shivaji Maharaj but after his death. It all started in 1682 after his death and lasted till the death of Aurangzeb in the year 1707. The Marathas in this stretch of 25 years not only withstood the full might of Moghal Empire but dealt severe blows to their empire and finally claimed to exercise a stake on the throne of Delhi in the coming years. The liberation movement laid by the disciples of Shivaji Maharaj in the span of 25 years saw many ups and downs. It is full of incidences of self valor, supreme sacrifice, utter determination, fierce battles, dramatic escapes and even events of treachery and shift of loyalties as well.

We intend to bring the summary of this entire episode of 25 glorious years thru' this blog series titled,"Maratha Uprising against Mughal Empire- 1682 to 1707. We would be publishing a Marathi and an English article each in alternate week on this subject.That's 4 articles, 2 each in Marathi and English and 48 total spread over a year. The team of authors who would be engaged in writing on these glorious period comprises of Umesh Joshi, Amol Mandke, Ketav Chaphekar, Rahul Bhave, Aditi Kajrekar and Janhvi Datar. Parag Limaye and Umesh Joshi will take the responsibility of editing and fine tuning of these articles. Needless to say this blog series will be dedicated to an actual and factual episodes of history. All the available references and the resources with atmost care would be used for bringing forth the unknown and dark chapters of this great war of independence. The first article of the series written by Ms.Janhavi Datar is being published today. The topic of this article is Battle of Liberation - The Begining! Your valuable suggestions and feedbacks are most welcome on this blog. Looking forward to your spontaneous and overwhelming response.

Parag Limaye
15th May 2017

The end of an era!

The untimely death of RajaramMaharaj ushered in ray of hope in Mughal camp. From the seventeen years of zealous war against Marathas Aurangzeb learnt that key lies at forts. Hence, an aged emperor embarked upon an expedition to capture Maratha forts.

मराठ्यांच्या उत्तर दक्षिणेतील हालचाली



२ मार्च १७०० रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाविरुद्ध सुरु असलेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराचे तिसरे सत्र आरंभिले. आतापर्यंतच्या अनुभवावरून बादशहाचे आकलन झाले कि मराठ्यांचे मर्म त्यांच्या किल्ल्यांत आहे. ते जिंकून घेण्यासाठी एका प्रदीर्घ मोहिमेला सन १६९९ साली वसंतगड जिंकून सुरुवात झाली व सन १७०५ साली सहा वर्षानंतर राजमाची जिंकून याचा शेवट.

The Maratha Rousing - up the North and down the South


“The Marathas quickly conquered the south of Narmada. They spread like ants across the regions of Dakkhan, Khandesh, Varhad and Kokan” – Bhimsen Saksena

This note by Bhimsen Saksena sums up the rapid movements of Marathas in the Deccan. The years from 1700 (after Rajaram Maharaj’s death) till 1707 (the death of Aurangzeb) were the years that tested the bravery, loyalty and resilience of both the Marathas as well as the Mughals. After the death of Rajaram Maharaj it was the stalwart queen of the Bhonsle family; Tararani Bhonsle who was the driving force behind the Marathas. She deployed sardars such as Nemaji Shinde, Keso Trimal, Parsoji Bhonsle, Dhanaji Jadhav, Hanmantrao Nimbalkar and Hindurao Ghorpade on these missions. Marathas made their presence felt from Machallipattnam in the South to Bengal and Gujarat in the North.

WAKINKHEDA- THE LAST SEIGE

Wakinkheda, a small village in the Sagar (सगर) district of Karnataka is situated on the banks of rivers Bhima and Krishna. Wakinkheda was known for the sovereignty of it’s Berad community. The Berad community housed brave men who had once upon a time fought in defense of the Vijaynagar Empire. Pamnaik and Pidnaik were among the vice and valiant sardars of the Berad community. 

Tararani – The Warrior Queen

After the death of Shivaji Maharaj Maratha empire was sailing through the turbulent waters. The brutal death of Sambhaji Maharaj stormed the empire. Every disappointment strengthened the commitment towards the Swarajya.

बादशहा औरंगजेबाची अखेरची किल्लेमोहीम - वाकीनखेडा

इसवी सन १७०५ च्या पूर्वार्धात मोगल बादशहा औरंगजेब याने आपली शेवटची किल्ले मोहीम हाती घेतली. ती म्हणजे उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील वाकीनखेडा हा किल्ला जिंकायची मोहीम. आपला हट्ट न सोडता तसाच पुढे रेटला की होणाऱ्या नुकसानाबरोबरच किती टिंगल होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बादशहाची ही मोहीम. 

महाराणी ताराबाईंचा कारभार

दिनांक २ मार्च १७०० (जुलिअन दिनांक). सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा स्वर्गवास झाला आणि मराठी राज्य पुन्हा एकदा राजाविना पोरके झाले. शाहू राजे मोगलांच्या कैदेत होते आणि राजाराम महाराजांचे वारस लहान होते. इसवी सन १६८२ पासून स्वराज्यावर मोगलांचे परचक्र आले होते आणि त्यास प्रतिकार करता करता आता तब्ब्ल १८ वर्षे सरली होती. या कालावधीत मराठ्यांनी अतीव पराक्रम करून महत्प्रयासाने राज्य वाचवले होते.